निलेश राणेंना अखेर अटक, आजची रात्र तुरुंगातच!

May 20, 2016 9:45 PM0 commentsViews:

nilehs arest

20 मे : काँग्रेस नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांचा जामीन अर्ज चिपळूण कोर्टाने फेटाळून लावल्यानं त्यांना आजची रात्र न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे.

काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी नीलेश राणे यांची अटक अटळ होती. चिपळूण कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर नीलेश राणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टानंही त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. 23 मेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश हायकोर्टानं त्यांना दिले होते.

त्यानुसारच, नीलेश राणे आज चिपळूण पोलिसांपुढे शरण आले. पोलिसांनी लगेचच त्यांना अटक केली आणि वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. त्यानंतर त्यांना चिपळूण कोर्टापुढे हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. नीलेश राणे यांनी कोठडी मुक्काम टाळण्यासाठी जामीन अर्ज केला, पण कोर्टानं तो फेटाळला. आता त्यांना जामिनासाठी खेड सेशन्स कोर्टात जावं लागणार आहे. त्यामुळे आजची रात्र त्यांना कोठडीतच काढावी लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा