मुंबई हल्ल्या प्रकरणी लख्वीवर पाकिस्तानी कोर्टात चालणार खटला

May 20, 2016 10:12 PM0 commentsViews:

lakhvi-1

20 मे : मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे असलेला पाकिस्तानी अतिरेकी झकीउर रहमान लख्वीसह 6 आरोपींविरोधात पाकिस्तानमधल्या कोर्टात खटला चालणार आहे. पाकिस्तानी दहशतवादविरोधी कोर्टाने यांच्याविरोधात 166 लोकांच्या हत्येचे खटले चालवायला मंजुरी दिली. 25 मे रोजी या खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे.

यापुर्वी, 13 मार्च 2015 रोजी लख्वी विरोधात ठोस पुरवे नसल्यामुळे लख्वीची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत इस्लामाबाद कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. तसंच लख्वीची तत्काळ सुटका करण्याचेही आदेश कोर्टाने दिले होते. लख्वी हा फेब्रुवारी 2009 पासून तुरूंगात होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा