मोदींची साडेपाच तास चौकशी

March 27, 2010 2:37 PM0 commentsViews: 1

27 मार्चगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची एसआयटीपुढे आज तब्बल साडेपाच तास चौकशी झाली. पण गुजरात दंगलप्रकरणी चौकशी अजून बाकी आहे. त्यामुळे रात्री एसआयटीपुढे पुन्हा हजेरी लावणार असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका याचिकेवरून एसआयटीने मोदींना समन्स बजावले. गुजरातच्या गुलबर्ग लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांची हत्या याच दंगलीदरम्यान करण्यात आली होती. त्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 2002 नंतर पहिल्यादांच मोदी आज एसआयटीपुढे हजर राहिले.

close