मुंबई विद्यापीठात इंजिनिअरिंगचा पेपर घोटाळा, 8 जण अटकेत

May 21, 2016 2:01 PM0 commentsViews:

mumbai_univमुंबई – 21 मे : मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या इंजिनिअरिंगच्या उत्तरपत्रिकांचा घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलाय. याप्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या 4 क्लार्क, 3 शिपाई आणि 1 कस्टोडियन कर्मचार्‍यांना अटक करण्यात आलीये. हे सर्वजण विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी मदत करायचे. या सर्व प्रकारामुळे मुंबई विद्यापीठात खळबळ उडालीये.

इंजिनिअरिंगचा अप्लाइड मेथमेटिकच्या दुसरा पेपर फुटला होता. भांडुप पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी कारवाई करत पेपरफुटीचा भांडाफोड केला. आरोपींकडून आतापर्यंत 92 उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. परीक्षेदरम्यान या विद्यार्थ्यांकडून पैसे आणि हॉलतिकीट घेतले जात असे. त्यानंतर पेपर लिहितांना विद्यार्थ्यांची फक्त हजेरी लावली जात असे आणि पेपर तसाच कोरा सोडून येत असतं. पेपर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना रात्री पुन्हा विद्यापीठात बोलावून उत्तरपत्रिका सोडावून घेतल्या जात असे. एवढंच नाहीतर विद्यार्थी घरी पेपर घेऊन जात आणि दुसर्‍या दिवशी आणून देत. यानंतर हे पेपर परीक्षकांकडे पाठवले जात असत अशी माहिती पोलिसांनी दिलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा