दलितांना मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन करणारे तरुण विजय यांच्यावर दगडफेक

May 21, 2016 3:49 PM1 commentViews:

tarun_vijay3321 मे : उत्तराखंडमधील चकरातामध्ये दलितांना मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन करणारे राज्यसभेचे खासदार तरुण विजय यांच्यावर मंदिराबाहेर जमावाने तुफान दगडफेक केली. दलितांना प्रवेशबंदी असलेल्या मंदिरात विजय यांनी दलितांना सोबत घेऊन प्रवेश केल्याने त्यांच्यावर जमावाने दगडफेक केली. या दगडफेकेत विजय गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

उत्तराखंडची राजधानी देहरादूनपासून 100 किलोमिटर अंतरावर असलेल्या चकरातामध्ये राज्यसभेचे खासदार तरूण विजय दलितांवर होणारे अत्याचार आणि मंदिरात बंदी विरोधात आंदोलन करत आहे. जौनसार बावर भागातील अनेक मंदिरांत दलितांना प्रवेश दिला जात नाही. इथं पोखरी येथील शिलगुर मंदिर प्रसिद्ध आहे. तिथेही दलितांना बंदी घालण्यात आलीये. यासाठी तरुण विजय यांनी परिवर्तन यात्रा सुरू केलीये. शुक्रवारी संध्याकाळी ते मंदिरात पोहोचले असता जमावाने त्यांच्यावर तुफान दगडफेक केली. या संदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीष रावत यांनी विजय यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून लवकरच या हल्लेखोरांना अटक करू असं आश्वासन रावत यांनी दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • ketan

    so sad