‘फक्त ऐश्वर्याचे फोटो काढा’, ऐश्वर्याला सोडून अभिषेकचं ‘वॉकआऊट’

May 21, 2016 12:54 PM0 commentsViews:

ash-abhi21 मे : ऐश्वर्या-अभिषेकमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं समोर आलं आहे. सरबजीत प्रिमिअर शोसाठी बच्चन कुटुंबियाने हजेरी लावली होती. मीडियाचे कॅमेरे जेव्हा या जोडीचे फोटो टिपत होते तेव्हा अचानक अभिषेकने काढता पाय घेतला. ‘इन्ही की फोटो ले लो’ असं सांगत अभिषेकने व्यासपीठ सोडले.

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन सरबजीतच्या प्रिमिअरसाठी आले होते आणि त्यावेळी त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं दिसून आलं. ऐश्वर्या-अभिषेकचा फोटो काढण्यासाठी सर्व फोटोग्राफर्स उतावळे होते. मात्र, अभिषेक या सर्वांपासून दूर जात असल्याचे पहायला मिळाले. ऐश्वर्याने फोटो काढण्यासाठी अभिषेकला बोलावले मात्र तो आला नाही त्यानंतर मीडियाने आवाज दिल्यावर अभिषेक आला आणि काही फोटोज काढले. पण अभिषेक नाराज असल्याचे चेह-यावरुन दिसत होते. त्यानंतर अभिषेक मीडियाला म्हणाला की, ‘इन्ही की फोटो ले लो’ आणि तेथून निघून गेला. यानंतर ऐश्वर्याच्या चेहर्‍यावरील रंगच उडाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा