विंदाच्या नावाने ‘जीवनगौरव’

March 27, 2010 3:54 PM0 commentsViews: 6

27 मार्च साहित्य क्षेत्रात उत्तुंग काम करणार्‍या साहित्यिकाचा पुढील वर्षापासून सरकारकडून विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पुण्यातील साहित्य संमेलनात केली. दुपारी उशिरा संमेलनात दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांनी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक दबाव' या परिसंवादात हजेरी लावली. 'माध्यम तंत्रज्ञान आणि मराठी भाषा' हा परिसंवादही याच वेळी पार पडला. या परिसंवादाच्या व्यासपीठावरून बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.मीडिया सध्या सिनेमाविषयक वादांना अकारण महत्त्व देत आहेत. टीआरपी वाढवण्यासाठी मीडियातून नको त्या गोष्टींनाही महत्त्व दिले जात आहे. मीडियाने हे टाळायला हवे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

close