मावळमध्ये अल्पवयीन मुलींवर प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू

May 21, 2016 7:23 PM0 commentsViews:

पुणे – 21 मे : नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर हल्ला करण्यात आला. त्यात एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना तळेगावजवळील सदुंबरे गावात घडली. पायल संतोष जगताप असं या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तर, ऋतुजा काळूराम कुसुमकर ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर तळेगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.crime scene

पायल हिचे आई-वडील विटभट्टीवर काम करतात. पायल आणि ऋतुजा मावस बहिणी आहेत. आज सकाळी पायल आणि ऋतुजा नैसर्गिक विधीसाठी घराच्या पाठीमागे गेल्या होत्या. त्यावेळी आलेल्या हल्लेखोरांनी पायल आणि ऋतुजा यांच्यावर चाकूने हल्ला केला.

त्यात पायल हिचा जागीच मृत्यू झाला. तर, ऋतुजा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर तळेगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र हल्ल्याच्या नेमके कारण समजू शकले नाही हल्लेखोर अद्याप फरार असून तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा