अडीच कोटींची ऑडी R8 V10

May 21, 2016 8:23 PM0 commentsViews:

विराट कोहलीनं गुरुवारी ऑडी आर एट गाडीचं एक नवं व्हर्जन लाँच केलं. या गाडीची किंमत तब्बल अडीच आहे. ऑडी आर एट व्ही टेन. जर्मन कार. जगातल्या सर्वोत्कृष्ट स्पोर्टस् कारपैकी एक. अप्रतिम लूक, वार्‍यालाही लाजवेल असा वेग. इंटिरियर एका विमानाच्या कॉकपिटसारखे… एकदा का रस्त्यावर उतरली, की हिचा रुबाबच वेगळा.. हिची किंमत आहे फक्त… अडीच कोटी रुपये. पण इतकी महाग असण्यामागची नेमकी कारणं काय? उदाहारण म्हणजे ताशी शून्य ते 100 किलोमीटरचा वेग ही गाडी फक्त 3.9 सेकंदमध्ये गाठते.

अशी आहे ऑडी R8 V10

- इंजिन : 5204 सीसी
– टॉप स्पीड : ताशी 316 किमी
– गिअर : 6 (ऑटो ट्रान्स्मिशन)
– पॉवर : 533 बीएचपी
– इंधन क्षमता : 83 लीटर
– एअरबॅग्ज : 6

ही गाडी भारतात बनत नाही. जर्मनीहून आयात करावी लागते. त्यामुळे तिच्या किंमतीत थेट 100 टक्क्यांहून जास्त वाढ होते. ह्या गाड्यांचे सर्व पार्टस् हातानं एकत्र केले जातात, आणि इंजिनच्या वर त्या त्या इंजिनिअरचं नावही असतं. आणि हो, तिच्या सीटस्‌वर तुम्ही तुमच्या नावाचे इनटाईट्ल्सही कोरून घेऊ शकता. या गाडीची पेंटिंग प्रोसेसही मोठी कमालीची आहे. एका गाडीवर रंगाचे 10 ते 12 थर फवारले जातात.. हेच कारण आहे की ही गाडी इतकी छान चकाकते.

बंगळुरूमध्ये विराट कोहलीनं या गाडीचं एक नवं व्हर्जन लाँच केलं.. आता ही गाडी समोर असून ती चालवण्याचा मोह कुणालाच आवरणार नाही.. मग काय!! विराट गाडीत बसला आणि तिला रेसिंग ट्रॅकवर नेलं.. रणबीर कपूर आणि टीसीरिजचे भूषण कुमार यांच्याकडे ही गाडी अनेक वर्षांपासून आहे. अशी ह्या जगप्रसिद्ध स्पोर्टस् कारनं कुणाला वेड नाही लावलं, तरच नवल..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close