हरवलेल्या मुलांसाठी मुंबई पोलिसांची कार्यशाळा

March 27, 2010 4:08 PM0 commentsViews:

27 मार्चहरवलेली मुले किंवा रस्त्यांवर फिरणार्‍या बेवारस मुलांचे पुनर्वसन कसे करायचे, त्याची प्रक्रिया नक्की काय आहे, हे पोलिसांना समजावे यासाठी मुंबईच्या बाल आशा ट्रस्टने मुंबई पोलिसांसाठी एक कार्यशाळा आयोजित केली.निराधार मुले, हरवलेली मुले जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतात तेंव्हापासून ते निराधार आश्रमात किंवा बाल विकास मंडळात पोहोचवण्यापर्यंत नक्की काय करावे हे त्यांना या कार्यशाळेत समजावून सांगण्यात आले. एखादे हरवलेले मूल जेव्हा पोलिसांकडे येते तेव्हा त्याची सर्व माहिती आधी लिहून घेणे, त्याचा फोटो वर्तमानपत्रांमध्ये देणे, या प्राथमिक स्वरुपाच्या प्रक्रिया बर्‍याचदा पूर्ण होत नाहीत.त्यामुळे समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा अगदी छोट्या गोष्टी शिकवण्यासाठीही अशा प्रकारच्या कार्यशाळांची गरज आहे, असे मत पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी यावेळी व्यक्त केले.

close