एका लग्नाची ‘सैराट’ गोष्ट; पुण्यात रंगला आंतरधर्मीय विवाहसोहळा

May 22, 2016 2:58 PM0 commentsViews:

गोविंद वाकडे, पुणे

22 मे : जात आणि जातीच्या अजब परंपरांना छेद देत पुण्यामध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. आंतरजातीय आणि आंतरधर्माच्या असंख्य नागरिकांनी या विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली आणि हा विवाह सोहळा विशेष ठरला.

pimpri couple12

गोड धोड, पाहुणे, तरुणांचा अमाप उत्साह आणि वधु-वराला शुभ आशिर्वाद देण्यासाठी शेकडोच्या संख्येने वर्‍हाडी मंडळी आले. आहो थांबा…! हे कुठलं अरेंज मॅरेज नाहीये, तर हे आहे एका आंतरजातीय आणि आंतरधर्माच्या प्रेमी युगुलाचा विवाहसोहळा. विशाल पोखरकर आणि आरजू तांबोळी हे दोघंही काही वर्षांपूर्वी एकमेकांना भेटले होते आणि त्यांच्यातल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. विशाल हा हिंदु तर आरजु मुस्लिम धर्माची आहे. आणि हे दोघंही लग्नबंधनात अडकले. मात्र त्यांच्यासाठी लग्नापर्यंतचा हा प्रवास फारच कठीण होता.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर काही परिवर्तनवादी संघटनांनी मिळून हा लग्नसोहळा जुळवून आणला. विशाल आणि आरजू यांनी घेतलेल्या निर्णयाला बाबा आढाव, राजन खान ,यांच्यासह समाजातील अनेकांनी पाठिंबा दिला. एवढचं नाही तर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली आणि या सर्वांच्या उपस्थित झालेल्या चळवळीतील गाण्या-उखाण्यांनी सोहळ्याची ऊंची अधिकच वाढत गेली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा