किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती

May 22, 2016 6:58 PM0 commentsViews:

Kiran bedi123

22 मे : माजी आयपीएस अधिकारी आणि भाजप नेत्या किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी (लेफ्टिनेंट गव्हर्नर) नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी रविवारी नियुक्त करण्यात आल्याची घोषणा केली.

गेल्या आठवड्यातच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसची सत्ता आली आहे. त्यानंतर आज केंद्र सरकारने बेदींची इथे नायब राज्यपाल पदी नियुक्ती केली आहे. लेफ्टिनेंट जनरल ए. के. सिंग हे पुद्दुचेरीचे प्रभारी नायब राज्यपाल म्हणून पदभार सांभाळत होते. त्यांच्याकडे आता अंदमान आणि निकोबारचा पदभार आहे.

दिल्लीत गेल्यावर्षी 2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी किरण बेदी या भाजपात सामील झाल्या होत्या. भाजपाने किरण बेदी यांना ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होत्या. पण या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला होता.

सरकारने अशी संधी दिल्यामुळे मी सरकारची आभारी आहे, अशी प्रतिक्रिया बेदींनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा