संमेलनासाठी निवडणूक नको

March 27, 2010 4:17 PM0 commentsViews: 2

27 मार्चसाहित्य संमेलनासाठी होणारी निवडणूक ही अत्यंत लज्जास्पद प्रकार आहे. तो ताबडतोब बंद व्हायला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेऊन चर्चा घडवून आणावी, असे आवाहन ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी केले. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक दबाव', तसेच 'माध्यम तंत्रज्ञान आणि मराठी भाषा' असे दोन परिसंवाद आज पुणे येथील साहित्य संमेलनात एकत्रित करण्यात आले. या परिसंवादात डॉ. पटेल यांनी हे मत व्यक्त केले.

close