कुपवाड्यातील चकमकीत महाराष्ट्राचे सुपुत्र पांडुरंग गावडे यांना वीरमरण

May 22, 2016 4:12 PM0 commentsViews:

pandurang gaiwad

22 मे :   जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सिंधुदुर्गचे सुपुत्र पांडुरंग महादेव गावडे यांना वीरमरण आलं आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या पांडुरंग गावडे यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं.

काल कुपवाड्यातल्या डरुगमुल्ला गावात दहशतवादी लपून बसले होते. त्यानंतर भारतीय जवानांनी खास ऑपरेशन राबवून या दहशतवाद्यांना घेरलं आणि पाचही दहशतवाद्यांचा खात्मा केला. चकमकीवेळी गावडे यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते.

शहीद पांडुरंग गावडे मूळचे सिंधुदुर्गच्या आंबोली गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आणि 2 मुलं असा त्यांचा परिवार आहे. त्यांचे मोठे बंधू निवृत्त सैनिक आहेत तर धाकटे बंधू सैन्यदलात कार्यरत आहेत. उद्या (सोमवारी) पांडुरंग गावडे यांच पार्थिव आंबोलीत आणलं जाण्याची शक्यता असून त्यांच्या जन्म गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा