औरंगाबादचा ‘एव्हरेस्ट’वीर पोलीस हवालदार रफीक शेखला हिमदंश

May 22, 2016 9:10 PM0 commentsViews:

Rafiq Shaikh

22 मे :  महाराष्ट्राचे पोलिसांमधील पहिले ‘एव्हरेस्ट’ वीर रफिक शेख यांच्या पायाला इजा झाली आहे. एव्हरेस्ट उतरताना रफिक शेखला हिमदंश झाला असून, काठमांडूच्या खासगी रुग्णालयात रफिक यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रफिक शेख यांच्या डाव्या पायाच्या तीन बोटांना त्यांना हिमदंश झाला आहे. सध्या रफिक यांच्यावर काठमांडूत उपचार सुरू असून, उद्या दिल्लीला हलवले जाणार आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचं एक पथक दिल्लीला रवाना झालं आहे. दरम्यान, रफीक यांच्यावर होणार्‍या उपचाराचा खर्च हा राज्य सरकार करणार आहे.

रफिक शेख हे औरंगाबादमध्ये पोलीस हवालदार असून, 4 एप्रिलला ते एव्हरेस्ट मोहिमेवर गेले होते. दोनदा अपयशानंतर तिसर्‍यांदा रफिक यांनी एव्हरेस्ट सर केला. मात्र, एव्हरेस्ट उतरताना त्यांच्या पायाला इजा झाली आहे.

हिमदंश म्हणजे काय?

– हिमदंश म्हणजे पेशींचं गोठणं
– अतिशीत वातावरणामुळे पेशी गोठतात
– पहिल्यांदा हिमचावे सुरू होतात (थंडीचे चटके बसतात)
– थंडीचे चटके सतत किंवा दीर्घकाळ बसले तर पेशी निकामी होतात
– शारीरिक कार्यक्षमतेवर त्याचा घातक परिणाम होतो
– अतिशीत वातावरणात हाता-पायावर अधिक परिणाम होतो
– कारण हे अवयव बर्फाच्या सतत संपर्कात येत असतात
– याची पुढची पायरी म्हणजे गँगरिनची शक्यता


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा