ठाण्यात लाखो लीटर पाणी वाया

March 27, 2010 4:30 PM0 commentsViews: 25

27 मार्चएकीकडे पाईपलाइन फुटण्याचे प्रकार सुरू असताना दुसरीकडे ठाण्यात पाईपलाइनच्या दुरुस्तीच्या नावाखाली लाखो लीटर पाणी वाया घालवले जात आहे. तानसा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा करणारी ही पाईपलाईन आहे. तानसा पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी 380 कोटी रूपये खर्च करण्याची घोषणा कालच बीएमसीच्या आयुक्तांनी केली होती. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या वेळी लाखो लीटर पाणी वाया घालवले जात आहे. गेले दोन दिवस या पाईपलाईनमधून पाणी पुरवठा बंद होता. त्यामुळे पाईपलाईनमधील एअरब्लॉक काढण्यासाठी महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी व्हॉल्व्ह काढले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पाहू लागले. पण एअरब्लॉक काढण्यासाठी पाणी वाहू देण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता, असे उत्तर महापालिकेचे अधिकारी देत आहेत. एकीकडे पाणीकपात करायची आणि दुसरीकडे दुरूस्तीच्या नावाखाली अशाप्रकारे पाणी वाया घालवण्याचे प्रकार रोखण्याची मागणी नागरिक करत आहेत.

close