जयललिता आज सहाव्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

May 23, 2016 9:13 AM0 commentsViews:

jaya-650_051311033836

23 मे :  तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या जयललिता आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जयललिता या सहाव्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवणार असून सहाव्यांदा या पदावर विराजमान होणार्‍या त्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री आहेत.

मद्रास विद्यापीठ परिसरात राज्यपाल डॉ. के. रोसैया जयललिता यांना मुख्यमंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. यावेळी ‘अम्मा’सोबत त्यांच्या 28 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईल. यावेळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येणार असून काही केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर पक्षांचे मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाने 232 पैकी 134 जागांवर विजय मिळवला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा