तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या जोडप्याला पोलिसांची बेदम मारहाण

May 23, 2016 12:15 PM0 commentsViews:

23 मे : तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या जोडप्याला कांदिवली पोलीसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी जबर मारहाण केल्याची ही घटना दहा-बारा दिवसांपूर्वी असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी बोरीवली सहाय्यक पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

CCTV marhan

कांदिवली पोलीस ठाण्यात 10 एप्रिल रोजी हे जोडपे तक्रार घेऊन आले होते. त्यावेळी ड्युटीवर असणार्‍या पोलीस कर्मचारी त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या जोडप्यातील महिलेने मोठ्या आवाजात त्यांना जाब विचारला. याचा राग धरुन पोलीस अधिकार्‍याने काठीने या महिलेस मारहाण करण्यास सुरुवात केली. यात तिच्यासोबत असणार्‍या पुरुषाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला देखील मारहाण केली. हा सगळा प्रकार तिथे असलेल्या एका नागरिकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेर्‍यात टिपला असून हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा