भिवंडीतल्या टँकर माफियांकडून सर्रास सुरू आहे पाणीचोरी

May 23, 2016 1:00 PM0 commentsViews:

23 मे : राज्यात दुष्काळ असताना भिवंडी आणि परिसरातील टँकर माफिया पाईपलाईनमधून आजही सर्रासपणे पंपाद्वारे पाणी चोरी करण्यात येत आहे. एवढच नाही तर चोरी करण्यात येणारे पाणी टँकरद्वारे जादा पैशांने विकण्यात येत असून त्याचं व्यापारीकरण केलं जात आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनचं अनेक ठिकाणी लिकेज होतं आहे. त्यामुळे दररोज हजारो लीटर पाणी वाया जातंय पण महापालिका याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.

Bhiwandi tanker

मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावांच्या पाईप लाईनची सुरक्षा करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. जलवाहिन्यांशेजारी अनधिकृत बांधकाम रोखणे, जल वाहिनीतून होणारी पाणी चोरी यावर आळा घालण्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाचीच आहे. तानसा, वैतरणा, भातसा , पिसे या धरणांमधून ब्रिटीश काळापासून मुंबईला पाणीपुरवठा होतो. मात्र याच जलवाहिनीतून पंपाद्वारे आजही सर्रासपणे पाणी चोरी होत आहे. चोरी केलेले पाणी टँकरद्वारे कंपन्यांना विकलं जात. पाणी चोरीत पाणी माफिया सक्रीय असून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरते. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा