जयललितांनी सहाव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

May 23, 2016 1:49 PM0 commentsViews:

jaya-swearing-in-759

23 मे  : अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता सहाव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. आज (सोमवार) दुपारी मद्रास विद्यापीठ परिसरात राज्यपाल डॉ. के. रोसैया यांनी जयललिता यांच्यासह 28 कॅबिनेट मंत्र्यांना शपथ दिली.

जयललिता सलग दुसर्‍यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. मंत्रिमंडळात जुन्या आणि नव्या चेहर्‍यांचे मिश्रण असून, यामध्ये मुख्यमंत्रिपदासह 4 महिलांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात 13 नवे चेहरे असतील. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला चित्रपट कलाकारांसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. केंद्रातील मंत्री व्यंकय्या नायडू या शपथविधीला हजर होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा