काँग्रेस कार्यकर्त्यांचे बेशिस्त वर्तन

March 27, 2010 4:53 PM0 commentsViews: 6

25 मार्चजळगाव जिल्ह्यात कार्यकर्ता शिबिरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अत्यंत बेशिस्त वर्तन केले. व्यासपीठावर कार्यक्रम सुरू असताना त्याच्या समोरच्या हॉलमध्ये काही काँग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. आणि याचे चित्रण करणार्‍या मीडियाच्या प्रतिनिधींवर काँग्रेसचे कार्यकर्ते धावून गेले. पत्रकारांना अक्षरश: धक्के मारून त्यांनी बाहेर काढले. अखेर हा गोंधळ मिटवण्यासाठी राणेंना व्यासपीठ सोडून खाली उतरावे लागले. आणि झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी पत्रकारांची माफी मागितली.

close