विंडीज दौर्‍यासाठी विराट आणि रहाणेवर जबाबदारी

May 23, 2016 5:09 PM0 commentsViews:

virat and rahane23 मे : वेस्ट इंडीज आणि झिम्बावे दौर्‍यासाठी भारतीय टीमची जाहीर करण्यात आलीये. वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी मुंबईकर अंजिक्य रहाणेवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. तसंच फास्टर बॉलर शार्दूल ठाकूरला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी टेस्ट टीमसाठी विराट कोहली कर्णधार असणार आहे.

जुलै ते ऑगस्टमध्ये भारत विंडीज दौर्‍यात भारतीय संघ चार टेस्टची मालिका खेळणार आहे. तर झिम्बावे दौर्‍यात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे, झिम्बावे दौर्‍यासाठी  विराट कोहली, शिखर धवन आणि रहाणेसह इतर खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीये.

विंडीजसाठी भारतीय संघ

विराट कोहली, मुरली विजय, शिखर धवन, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धीमान सहा, रविंद्र जाडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दूल ठाकूर आणि स्टुअर्ट बिन्नी

झिम्बावे दौर्‍यासाठी भारतीय संघ

- महेंद्र सिंह धोणी,के एल राहुल,फौझ फझल,-मनिष पांडे, करुण नायर,आर धवन,अक्षर पटेल ,जे यादव,धवल कुलकर्णी,जसप्रित भुमरा,बरिंदर सरन, मनदीप जाधव,जयदेव,उन्नादकत,चलल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा