मुंबईत ‘बर्निंग बस’, बस जळून खाक ;जीवितहानी नाही

May 23, 2016 6:03 PM0 commentsViews:

मुंबई – 23 मे : मुंबईतील कुर्ल्याजवळ एक खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने पेट घेतल्याची घटना घडलीये. या दुर्घटनेत बस जळून खाक झालीये. सुदैवाने बसमध्ये कुणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली.

mumbai busआज दुपारी दोन वाजेच्या सुमारास बोरिवलीहुन एक लॅक्झरी बस वडाळा येथे आर टी ओ कार्यालयाकडे जात असताना कुर्ल्याच्या ठक्कर बाप्पा सिग्नलजवळ अचानकया बसला आग लागली. बघता बघता या बसने पेट घेतला.सुदैवाने बसमध्ये कुणीही प्रवासी नव्हते त्यामुळे जीवितहानी झाली नाही.

बसला आग लागताच चालक आणि क्लिनरने बस मधून उडया मारल्या. घटनास्थळी तातडीन अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पोहचल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ही बस मुंबई ते लांजा अशी प्रवासी वाहतूक करते. प्रवासी सोडून ही बस वडाळाला जात होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा