एक तास लाईट बंद..

March 27, 2010 5:12 PM0 commentsViews:

27 मार्चपर्यावरणाबद्दल नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी WWF तर्फे 'अर्थ अवर'चे आयोजन करण्यात आले. रात्री साडेआठ ते साडे नऊ वाजेपर्यंत लाईट्स बंद करून पृथ्वीवरील पर्यावरणाला वाचवण्यासाठी हातभार नागरिकांनी हातभार लावला. मुंबईसह दिल्ली, चेन्नई, कोलकाता या शहरांमध्येही 'अर्थ अवर'च्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी नागरिकांनी एक तास बत्ती बंद ठेवून या मोहिमेला प्रतिसाद दिला. दादरमध्ये शिवाजी पार्क इथे यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला. वीज बचतीसाठीच्या या मोहिमेत महापौर श्रद्धा जाधवही सहभागी झाल्या.

close