‘नीट’साठी अध्यादेश काढण्याची घाई का ?, राष्ट्रपतींचा केंद्राला सवाल

May 23, 2016 7:18 PM0 commentsViews:

नवी दिल्ली – 23 मे : नीट परीक्षेबाबत अध्यादेश काढण्याची घाई का केली अशी विचारणा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्राला केलीये. नीटसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेतली. राष्ट्रपतींनी या संदर्भात कायदेशीर सल्ला मागवला आहे.president_on_neet

वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा अर्थात नीट सुप्रीम कोर्टाने लागू केली. पण, केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देत नीट परीक्षा वर्षभरासाठी पुढे ढकलण्यासाठी अध्यादेश जारी केला. पुढील वर्षी कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाईली अशी भूमिका केंद्राने मांडली. परंतु, या अध्यादेशाबद्दल राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली. या अध्यादेशाबद्दल कायदेशीर बाजू तपासून पाहावी अशी सुचना राष्ट्रपतींनी केली.

आज नीटसंदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी भेट घेतली. राष्ट्रपती आणि नड्डा यांच्या दरम्यानची बैठक संपली. या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींना स्पष्टीकरण दिलंय. तर राष्ट्रपतींनी अध्यादेश काढण्यासाठी इतकी घाई का केली अशी विचारणा केली. तर दुसरीकडे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना नीटबाहेर ठेवण्यासंदर्भातही नड्डा यांनी निवेदन दिलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा हा प्रयत्न नाही असंही स्पष्टीकरण नड्डांनी दिलंय.

या वर्षापुरता केवळ खाजगी आणि अभिमत विद्यालयांसाठी नीट परिक्षा लागू करण्यात आली असून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना ह्या वर्षापुरता नीटमधून दिलासा देण्यात आला आहे अशी माहिती नड्डा यांनी राष्ट्रपतींना दिली. तर राष्ट्रपतींनी यासंदर्भात कायदेशीर सल्लाही मागवला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा