…आणि त्याने घेतली सिंहाच्या पिंजर्‍यात उडी

May 23, 2016 7:46 PM0 commentsViews:

A lion rests under the shade at the Al Ain Safari in Al Ain, United Arab Emirates, Thursday, May 12, 2016. The world's largest man-made safari park with over 217 hectares and more than 250 animals, all in a natural habitat opened in April. (AP Photo/Kamran Jebreili)
23 मे : आत्महत्या करण्यासाठी कुणी कोणतं पाऊल उचलू शकतो याचा काही नेम नाही. चिलीमध्ये एक तरुण आत्महत्या करण्यासाठी स्वता:ला सिंहाच्या स्वाधिन केल्याची थरारक घटना चिलीमध्ये घडलीये. परंतु, तीन सिंहांच्या हल्ल्यातून या तरुणाची सुटका झालीये.

घडलेली हकीकत अशी की, चिलीची राजधानी असलेल्या सँटिआगोमध्ये एका प्राणसंग्रालयात आत्महत्या करण्यासाठी एका माथेफिरू तरुणाने नग्न होईन चक्क सिंहाच्या पिंजर्‍यात उडी मारली. आता आयतं शिकार मिळाल्यामुळे सिंहांनीही तरुणावर झडप मारली. बरं एक नाहीतर तीन सिहांनी या तरुणाचा फडशा पाडण्यासाठी हल्ला चढवला. दुसरीकडे संग्रालयातील कर्मचार्‍यांची एकच भंबेरी उडाली. या तरुणाला वाचवण्यासाठी एकच धावाधाव सुरू झाली. सिंहांना बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न केला गेला पण सिंहांवर याचा परिणाम झाला नाही. अखेरीस या तरुणाचा जीव वाचवण्यासाठी कर्मचार्‍यांना सिंहावर गोळीबार करावा लागला. या गोळीबार दोन सिंहांचा मृत्यू झाला. तेव्हा त्या तरुणाचा जीव वाचला. गंभीररित्या जखमी झालेल्या या तरुणाला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण झालेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा