जोतिबाची चैत्र यात्रा सुरू

March 27, 2010 5:14 PM0 commentsViews: 87

27 मार्चदख्खनचा राजा अशी ख्याती असलेल्या श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेला कोल्हापुरात सुरुवात झाली आहे. या यात्रेत मान असतो तो सासनकाठ्यांचा. बेळगाव येथील चव्हाट गल्लीतील मानाच्या सासनकाठ्यांसह इतर अनेक सासनकाठ्या जोतिबाच्या डोंगरावर दाखल झाल्या आहे. आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक या राज्यांतूनही अनेक भाविक दर्शनासाठी आलेत. 'जोतिबाच्या नावानं चांगभलं' म्हणत ढोल ताश्यांच्या तालावर सासनकाठ्यांसह भाविकांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली. यात्रेचा मुख्य दिवस सोमवारी आहे. मात्र आतापासूनच जोतिबाच्या डोंगराचा परिसर गुलालाने न्हाऊन निघाला आहे.

close