शहीद पांडुरंग गावडेंवर उद्या अंत्यसंस्कार

May 23, 2016 7:54 PM0 commentsViews:

 pandurang gaiwad
23 मे : काश्मीरमधल्या कुपवाडा भागात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत शहीद झालेल्या पांडुरंग महादेव गावडे यांचं पार्थिव दिल्लीमध्ये आणण्यात आलंय. याआधी श्रीनगरमध्ये त्यांना लष्करानं अखेरची सलामी दिली.

पांडुरंग गावडे कुपवाड्यात दहशवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचं पार्थिव आज रात्री 9 पर्यंत गोव्यात आणलं जाईल आणि उद्या (मंगळवारी) सकाळी सिंधुदुर्गमधल्या आंबोलीत आणलं जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या अंत्ययात्रेत मराठा रेजिमेंटचे 100 जवान आणि लष्करी अधिकार सामील होणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा