पाहा पोलिसांची गुंडगिरी

May 23, 2016 9:41 PM0 commentsViews:

मुंबई – 23 मे : पोलिसांत तक्रार दाखल करायला गेलेल्या महिलेला पोलीस अधिकार्‍यानं मारहाण केल्याची घटना घडलीये. या प्रकरणी बोरीवली सहाय्यक पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

मुंबईच्या कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये 10 मे रोजीची ही घटना आहे. एक जोडपं तक्रार करायला कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं होतं. तेव्हा ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकार्‍याने त्यांची तक्रार घेतली नाही. त्यामुळे या जोडप्यात आणि पोलिसांत वाद झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला आणि पोलिसांनी महिलेला मारहाण केली. या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या मित्रालाही पोलिसांनी मारहाण केली. हा सर्व प्रकार कॅमेर्‍यात कैद झालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा