जडेजावरची बंदी कायम

March 27, 2010 5:20 PM0 commentsViews: 1

27 मार्चराजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजावरची बंदी आयपीएल प्रशासनाने कायम ठेवली आहे. त्यामुळे या हंगामात खेळण्याचे जडेजाचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. आयपीएल प्रशासनाने नेमलेल्या एक सदस्यीय समितीने आज हा निर्णय जाहीर केला. राजस्थान रॉयल्ससोबत करार असताना दुसर्‍या टीमशी संपर्क साधून मानधनासाटी सौदेबाजी केल्याचा आरोप जडेजावर होता. आणि त्यासाठी एका महिन्यापूर्वी त्याच्यावर तिसर्‍या हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. जडेजाने याविरोधात केलेल्या अपिलाच्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला आहे.

close