नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरूच, तरुणाची गोळ्या झाडून हत्या

May 24, 2016 1:23 PM0 commentsViews:

kolhapur crimeनाशिक – 24 मे : नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरूच आहे. आज पहाटे संदीप चव्हाण या युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. गेल्या 4 दिवसांत हत्येची तिसरी घटना आहे.

सातपुर कॉलनी भागातील जिजामाता मैदान भागात संदीप चव्हाणवर गोळीबार झाला. किशोर जाधव याने गोळीबार केला होता. सावकारी धंदा असलेला किशोर जाधव हा ठाणे येथील नगरसेवक हत्याप्रकारणातील आरोपी संजय जाधव याचा मोठा भाऊ असून, मयत संदीप चव्हाण हा महिंद्रा झोपडपट्टी येथील असून तो आजूबाजूच्या औद्योगिक वसाहतीत चहा पुरवायचा पण त्याचबरोबर तो व्याजाचे पैसे गोळा करण्याचेही काम करायचा. गेल्या 4 महिन्यांमधली हत्येची ही 23 वा घटना आहे. गेल्या काही काळापासून इथं छोटी छोटी टोळीयुद्ध, किरकोळ कारणांवरून वाद, मारामारी अशा घटनांमध्ये वाढ झालीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा