शहीद पांडुरंग गावडे अनंतात विलीन

May 24, 2016 1:36 PM0 commentsViews:

 gavande24 मे : शहीद पांडुरंग महादेव गावडे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आंबोली या त्यांच्या मुळगावी त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. त्यापूर्वी आंबोलीमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. गावडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा फक्त चार महिन्यांचा आहे.

मूळचे मराठा लाइट इन्फंट्रीचे आणि सध्या 41 राष्ट्रीय रायफल्स या दहशतवादविरोधी पथकात असलेले गावडे सर्व प्रकारच्या युद्धकौशल्यात आणि तंत्रकौशल्यात पारंगत होते. कुपवाडा इथं झालेल्या या चकमकीदरम्यान पांडुरंग गावडे यांच्या जवळचं झालेल्या हातबॉम्बच्या स्फोटात त्यांच्या पायाला आणि डोक्याला जबर दुखापत झाली. उपचारादरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा