लोकलमध्ये स्टंटबाजी बेतली जीवावर, 2 तरुणांचा मृत्यू

May 24, 2016 2:38 PM0 commentsViews:

मुंबई, 24 मे : धावत्या लोकलमधून बाहेर हात पाय बाहेर काढू नका अशी वारंवार सुचना दिली जाते पण काही महाभाग याकडे कानाडोळा करून जीवाशी खेळ करता. अशीच स्टंटबाजी दोन तरुणांच्या जीवावर बेतलीये.local4

चालत्या लोकलमधून स्टंट करणं तरुणांच्या जिवावर उठत असलं तरी या प्रकाराला काही केल्या आळा बसत नाहीये. रेल्वे प्रवासादरम्यान स्टंटबाजी करताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडतच आहेत. रविवारी रात्री चालत्या लोकल वर स्टंट करताना एकाचा मृत्यु झाला तर एक जण जखमी झाला. 18 वर्षाचा अमान शेख नावाचा तरूण आपल्या काही मित्रांसोबत चालत्या लोकलमध्ये स्टंट करत होता मात्र ही मस्ती त्याच्या जीवावर बेतली. तर इमरान नावाच्या एका 32 वर्षीय तरूणानं अशाच स्टंटबाजीत आपला जीव गमावला. 18 वर्षाचा अमान शेख चालत्या गाडीत स्टंट करत होता आणि प्लॅटफॉर्म वर चालत असलेल्या एका व्यक्तीला पायाने मारण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या लक्षात यायच्या आत तो एका खांबावर धडकला, आणि त्याचा मृत्यू झाला. अमानची ही हुल्लडबाजी विक्रोळी स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालीये.

अशीच आणखी एका घटनेत चालत्या लोकलमधून मस्ती करताना एक तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. मध्य रेल्वेच्या विक्रोळी आणि घाटकोपर स्टेशन दरम्यानची ही घटना आहे. 9 वाजून 40 मिनिटांची ही घटना आहे. साकीनाका इथं राहणार 32 वर्षीय इमरान शेख चालत्या ट्रेनमधून विक्रोली आणि घाटकोपर स्टोशनांच्या दरम्यान पडला. जीआरपीच्या माहितीप्रमाणे इमरान स्टंट करत होता यामुळे तो पोलाला धडकून पडला.  त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा