शिखर-शिंगणापूरमध्ये कावडी दाखल

March 27, 2010 5:27 PM0 commentsViews: 81

27 मार्चसातार्‍यात शिखर-शिंगणापूर इथे शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी राज्यभरातून कावडी दाखल झाल्या आहेत. शिखर-शिंगणापूर इथे 8 दिवस चैत्री यात्रा भरते. त्यासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक इथूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेत. शिवाजी महाराजांचे हे कुलदैवत…जलाभिषेकासाठी मानाच्या कावडी डोंगर कपारीतून मुंगी घाटातून वर चढवल्या जातात. या कावडीतून नेलेल्या पाण्याचा रात्री उशिरा महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो. मानवी साखळी करून मोठमोठ्या कावडी घाटातून वर नेल्या जातात. त्यावेळी महादेवाला एकेरी नावाने हाक मारली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात.

close