मुंबईत भरदिवसा तरुणीवर चाकू हल्ला

May 24, 2016 5:22 PM0 commentsViews:

मुंबई – 24 मे: चेंम्बुर भागातील सुमन नगर येथे एका तरुणीवर भरदिवसा चाकू हल्ल्याची घटना घडलीये. या हल्ल्यात 22 वर्षीय करिश्मा माने हिचा मृत्यू झालाय.crime scene

चेंम्बुर परिसरातील सुमननगर भागात राहणारी करिश्मा माने ही तरुणी कामावर जात असताना सकाळी 10 च्या सुमारास अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ एका तरुणाने चाकू हल्ला केला. जखमी अवस्थेत या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस तपास करत आहे. हा हल्ला नेमका का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा