यंदा देशात 109 टक्के पाऊस, स्कायमेटचा अंदाज

May 24, 2016 6:36 PM0 commentsViews:

rain_2401333f24 मे : दुष्काळाने हवालदील झालेल्या बळीराजाला स्कायमेट या खाजगी संस्थेनं दिलासा दिलाय. यंदा देशभरात सरासरीपेक्षा 109 टक्के पाऊस पडणार असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. तसंच मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात जास्त पाऊस होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्याचबरोबर मध्य भारत आणि पश्चिम भारतातही चांगला पावसाचं भाकित स्कायमेटनं वर्तवलं आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती निर्माण झालीये. मागील वर्षी वरुणाराजाने कृपादृष्ट वळल्यामुळे कमी पाऊस पडला. यंदा मात्र, भारतीय हवामान खात्याने दमदार पावसाचा अंदाज वर्तवलाय. यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के पावसांचं भाकित भारतीय हवामान खात्याने आधीचं वर्तवलंय. त्यापाठोपाठ स्कायमेट या खासगी संस्थेनं आज नव्याने पावसाचा अंदाज वर्तवलाय. यंदा सरासरी 109 टक्के पाऊस पडणार असल्याचं स्कायमेटने जाहीर केलंय. यापूर्वी स्कायमेटने 105 टक्के पावसाचं भाकित वर्तवलं होतं. यंदा जूनमध्ये 164 मिमी पाऊस, जुलैमध्ये 289 मिमी, ऑगस्टमध्ये 261 मिमी, तर सप्टेंबर महिन्यात 173 मिमी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवलाय. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर यंदाचं वर्ष हे बळीराजाचं असणार यात शंका नाहीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा