फेटे बांधण्याचा रेकाॅर्ड गिनीज बुकात

May 24, 2016 8:19 PM0 commentsViews:

24 मे : पुण्यात संतोष राऊत या तरुणाने फेटे बांधण्याचा अनोखा रेकॉर्ड केला आहे. एका तासाच्या आत 84 पुरुष आणि 45 महिला अशा 129 लोकांना फेटे बांधून संतोषने हा रेकॉर्ड केला आहे. संतोषच्या या रेकॉर्डची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील घेण्यात आली आहे. या आदी एका तासाच्या आत 35 फेटे बांधण्याचा रेकॉर्ड पंजाबमधील एका व्यक्तीचा नावावर होता. मात्र हा रेकॉर्ड मोडून काढत संतोषने हा नवा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे. हा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवण्याकरिता संतोष दर दिवशी फेटे बांधण्याचा कसून सराव करत असे. आपल्या संस्कृतीत फेटे बांधण्याला अतिशय महत्त्व असल्याने मी हा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदिवण्यात निश्चय केलं असं संतोषने सागितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा