दाऊदला फोन नाहीच !; मेनन यांची चौकशी करा, खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

May 24, 2016 9:16 PM0 commentsViews:

khadse_to_cm_letter24 मे : दाऊद इब्राहिमला कुठलाही फोन केला नाही आणि आलाही नाही अशी स्पष्टोक्ती देत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुरावे सादर केले आहे. तसंच या प्रकरणी आपच्या नेत्या प्रीती मेनन, मनीष भंगाळे, जयेश दवे यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी व्हावी अशी मागणीही खडसेंनी केलीये.

आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन यांनी अलीकडे पत्रकार परिषद घेऊन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. दाऊदच्या पत्नीचा फोन हॅक करण्यात आला होता. त्या फोनमध्ये एकनाथ खडसे यांना फोन करण्यात आला होता. खडसेंचा नंबरच कॉल लॉगमध्ये होता असा आरोप मेनन यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. खडसे यांनी यावर लगेच खुलासाही केला होता. काल खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन आपल्या कॉललॉगचे पुरावे दिले आहे. मला दाऊदचा फोन आला नाही आणि मीही दाऊदला कधी फोन केला नाही. मुळात त्या नंबरचा फोन बंद होता असा दावा खडसेंनी केला. तसंच एखाद्यावेळेस त्या नंबरच्या सीमकार्डचं हॅकरने क्लोन करून त्याचा बेकायदेशीररित्या वापरलेला दिसतो. अशा रितीने माझ्या सीमकार्ड क्लोन केलेले असतांना सुद्धा त्यावरुन एकही आंतरराष्ट्रीय कॉल केलेला नाही असंही खडसेंनी स्पष्ट केलं. प्रीती मेनन, मनीष भंगाळे आणि जयेश दवे यांनी वेबसाईट हॅक करण्यासाठी 85 लाख रुपये दिले अशी कबुली दिलीये. हा कायद्याने गुन्हा असून त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणीही खडसेंनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा