ताडोबाच वाघोबांचं सर्वात मोठ घरं, सर्वाधिक वाघांची झाली नोंद

May 24, 2016 9:34 PM0 commentsViews:

tadoba tiger24 मे : चंद्रपुरात ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात बुद्ध पौणिमेच्या दिवशी झालेल्या गणनेत एकटया ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात तब्बल नव्वद वाघांसह 29 बिबटयांचे वन्यजीवप्रेमीना दर्शन झालंय. राज्यात सर्वाधिक वाघ ताडोबात असल्याचं शिक्कामोर्तब झालंय.

बुद्ध पौणिमेला राज्यातल्या व्याघ्रप्रकल्पातल्या पाणवठयावर होणारी वन्यप्राण्यांची मचाणावर बसून केली जाणारी गणना तांत्रिकदृष्टया ग्राह्य धरली जात नसली तरी या प्रक्रीयेची जय्यत तयारी वनविभागाने केली होती. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात 207 मचाणी उभारण्यात येऊन त्यात 456 वन्यजीवप्रेमी सहभागी झाले होते. बुद्ध पौणिमेला कोअर क्षेञात तब्बल पन्नास तर बफर क्षेञात चाळीस वाघासह 29 बिबटयांचे दर्शन मचाणीवर बसलेल्या वन्यजीवप्रेमींना झाले असून सोबतच बफर झोनच्या सहा परिक्षेञात 374 चितळ .128 सांबर, 42 नीलगाई, 272 जंगली म्हशी, 631 वानरांचं तर 573 रानडुक्करांची नोंदही यावेळी घेण्यात आली. एकूण ताडोबात सर्वाधिक वाघ असल्याचे परत एकदा शिक्कामोर्तब झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा