दुष्काळी भागातल्या बांधकामांसाठी पाणी पुरवण्यात येऊ नये – हायकोर्ट

May 25, 2016 10:10 AM0 commentsViews:

Mumbai high court
25 मे :  राज्यातील दुष्काळी भागात बांधकामांसाठी पाणी पुरवण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने मंगळवारी राज्य सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. हा आदेश जुन्या किंवा नव्या दोन्ही बांधकामांसाठी लागू आहे.

संपूर्ण मराठवाडय़ासह राज्यातील 13 जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. या पार्श्वभूमीवर या भागात सुरू असलेल्या बांधकामांना दिल्या जाणार्‍या पाण्याचा पुरवठा तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी कोर्टाने हे आदेश दिले.

राज्यातील दुष्काळी भागामधील पाण्याचा कोणताही स्त्रोत खासगी राहू शकत नाही. धरणांमध्ये आणि विहिरींमध्ये जे पाणी शिल्लक आहे, त्याचा वापर प्राधान्याने फक्त पिण्यासाठीच केला जावा. इतर कोणत्याही कारणांसाठी तूर्ततरी पाणी देण्यात येऊ नये, असेही कोर्टाने म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा