शिवडीत फ्लेमिंगो फेस्टिवल

March 27, 2010 5:43 PM0 commentsViews: 8

आरती कुलकर्णी, मुंबई 27 मार्चमुंबईत शिवडीच्या मडफ्लॅटमध्ये दरवर्षी प्लेमिंगो येतात. इथे 25 हजारांहून जास्त फ्लेमिंगोंची नोंद झाली आहे. याबद्दल जागृती करण्यासाठी बीएनएचएसने इथे फ्लेमिंगो फेस्टिवल भरवला होता. या फेस्टिवलचे हे चौथे वर्ष आहे.रोजच्या सगळ्या धकाधकीतून वेळ काढून या फेस्टिवलच्या निमित्ताने मुंबईकर शिवडीच्या जेट्टीवर फ्लेमिंगो पाहायला जमले होते.फ्लेमिंगोंच्या सोबत हजारो स्थलांतरित पक्षी इथे येतात. पण या पक्ष्यांच्या या वसतिस्थानावर शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचे बांधकाम होणार आहे. या पुलाचा मार्ग इथून 500 मीटर वळवावा आणि फ्लेमिंगो वाचावेत म्हणून बीएनएचएसने सह्यांची मोहीम सुरू केली आहे.शिवडी-न्हावा सी लिंकचे बांधकाम आधी एमएसआरडीसीकडे होते. पण आता ते एमएमआरडीए करणार आहे. मुंबईकरांची आणि या फ्लेमिंगोंची हाक या फेस्टिवलमुळे सरकारपर्यंत पोहोचली आहे.

close