गायक अरिजीत सिंगने सलमानची मागितली जाहीर माफी

May 25, 2016 2:10 PM0 commentsViews:

tiyertyeduyy

25 मे :  बॉलिवूडचा प्रसिध्द गायक अरिजीत सिंगने बॉलिवूडचा सुल्तान सलमान खानची जाहीर माफी मागितली आहे. ‘सुलतान’ चित्रपटासाठी त्याने एक गाणं गायिलं आहे. हे गाणे चित्रपटातून काढून टाकायचा निर्णय सलमानने घेतला आहे. हे गाणे राहू द्यावं अशी विनंती करीत यापूर्वी घडलेल्या प्रकाराबद्दल अरिजितने फेसबुकवरुन जाहीर माफी मागितली आहे.

दोन वर्षांपूर्वी सलमान खान आणि अरिजित सिंग यांच्यामध्ये एका अवॉर्ड शोमध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाली होती. तेव्हापासून त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटासाठी अरिजित सिंगने गायलेले गाणे सलमानने चित्रपटातून काढायला लावले होते. त्यानंतर आता त्याच्या ‘सुलतान’साठीही अरिजित सिंगने एक गाणं गायलं आहे. ते सलमानने चित्रपटातून काढू नये, अशी अरिजितने विनंती केली आहे.

E1D491C6-E600-4C48-B622-2A79BFE2B566_L_styvpf
सलमानचा अपमान करण्याचा अरिजितचा कधीच हेतु नव्हता. हे त्याने सलमानला समजवण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला. त्याला फोन केला, मेसेज पाठवला पण सलमान मानायलाच तयार नाही. शेवटी सोशल मीडियाच्या माध्यामातून अरिजितने सलमानची जाहीर माफी मागितली आहे. अर्थात थोड्यावेळाने अरिजितने ही पोस्ट काढूनही टाकली.

दरम्यान , याआधी ज्यांनी सलमानशी पंगा घेतलाय, त्यांच्या कारकीर्दीवर त्याचा खूप वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे आता अरिजीत सिंगच्या करिअरवर याचा परिणाम होणार नाही, ही आशा.
पण अरिजीतच्या या ओपन लेटरचा सलमानवर काय परिणाम होतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अरिजीतनं पत्रात काय म्हटलंय..

मी तुम्हाला फोन आणि मेसेज करायचा खूप प्रयत्न करतोय. मी तुमचा अपमान केला, हा तुमचा गैरसमज आहे. त्या शोमधला तो क्षण चुकीचा होता. तरीही तुम्हाला अपमानित झाल्यासारखं वाटलं. मी समजू शकतो. मी त्यासाठी मनापासून माफी मागतो. मी तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न केला, एसएमएस केले, पण तुम्हाला ते कळलं नाही. म्हणून आज मी सर्वांसमोर तुमची माफी मागतो. प्लीज. मी विनंती करतो. ‘सुलतान’मध्ये मी तुमच्यासाठी जे गाणं गायलं होतं, ते कृपया काढू नका. हवं तर कुणाकडूनही ते गाऊन घ्या, पण माझं गाणं काढू नका. मला माहित नाही मी हे का करतोय. मला हेही माहित आहे की तुम्हाला फरक नाही पडणार.

पण मी तुमचा फॅन राहीन, भाईजान…

जग घुमेया, थारे जैसा कोई नही

तुमचा,
अरिजीत सिंग


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा