भुजबळ काका-पुतण्याच्या न्यायालयीन कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ

May 25, 2016 4:37 PM0 commentsViews:

sameer_And_chagan_bhujbal25 मे : मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि समिर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांनी पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ गेले दोन महिने तुरुंगात आहेत. आता जूनपर्यंत त्यांचा मुक्काम जेलमध्ये वाढला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा