नाशिकमध्ये शाळेबाहेर बॉम्बसदृश वस्तू आढळल्यामुळे खळबळ

May 25, 2016 4:49 PM0 commentsViews:

नाशिक – 25 मे : नाशिकमध्ये एका शाळेच्या बाहेर बॉम्बसदृश वस्तू आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. बॉम्बनाशक पथकाने ही वस्तू निकामी केलीये. परंतु, ही वस्तू कुणी आणि का इथं ठेवली याचा तपास पोलीस करत आहे.

 nsk_bombद्वारका भागातल्या रवींद्रनाथ विद्यालयाच्या बाहेर बाॅम्बसदृश वस्तू आढळली. यात मोबाईल टॅबला काही वायरिंग आणि सर्किट आढळून आल्यानं तसापासाठी आलेल्या श्वान पथक आणि बॉम्बनाशक पथकाला घटनास्थळी बोलावलं. त्यानंतर मोकळ्या मैदानात जाऊन ही वस्तू नष्ट करण्यात आली. या वस्तूचे नमुने रासायनिक लॅबकडे पाठवणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच ही वस्तू या ठिकाणी कोणी ठेवली यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याचं ही पोलिसांनी सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा