अंकुश चौधरीकडून ‘जलयुक्त शिवार’ला 4 लाखांची मदत

May 25, 2016 5:21 PM0 commentsViews:

25 मे : मराठी चित्रपट सृष्टीतला सुपरस्टार अंकुश चौधरीनं जलयुक्त शिवार योजलनेला मदतीचा हात पुढे केलाय. यासंदर्भात अंकुशनं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. अकुंशनं जलशिवार योजनेसाठी 4 लाखांची मदत दिलीये. जलयुक्त शिवार योजनेसाठी चित्रपट सृष्टीतील लोकांनी पुढे येऊन दुष्काळग्रस्तांना मदत करावी अशी भावना अंकुशनं व्यक्त केलीये. याआधी बॉलिवूड स्टार आमिर खान, अक्षयकुमार, रितेश देशमुखने मदत देऊ केलीये. त्याच पंक्तीत आता मराठी सुपरस्टार अंकुश चौधरीचं नाव जोडलं गेलंय. अंकुशच्या या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा