अन्न पाणी घेण्यास साध्वी प्रज्ञासिंगचा नकार

March 29, 2010 7:32 AM0 commentsViews: 1

29 मार्चमालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंगने अन्न, पाणी आणि औषधोपचार घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी तिच्यावर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साध्वीची जबानी घेण्यासाठी कोर्टाचे प्रतिनिधी जिल्हा रुग्णालयात गेले होते. कोर्ट कमिशनने घेतलेला प्रज्ञासिंगचा गोपनीय जबाब उद्या कोर्टापुढे मांडण्यात येईल

close