मंत्रालयातील कॉम्प्युटरवर व्हायरसचा हल्ला, 150 हून जास्त कॉम्प्युटर करप्ट !

May 25, 2016 5:53 PM0 commentsViews:

मुंबई – 25 मे : राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयातील कॉम्प्युटरवर व्हायरसने हल्ला केल्याची बाबसमोर आलीये.
मंत्रालयातले 150 हून अधिक कॉम्प्युटर व्हायरसमुळे करप्ट झाले आहे. ‘लॉकी रॅन्सन’ नावाचा हा व्हायरस आहे.mantralaya_pc4

राज्यातील सर्व कारभाराचा लेखाजोखा मंत्रालयातील कॉम्प्युटरवर केला जातो. याच कॉम्प्युटरमध्ये व्हायरस घुसल्यामुळे खळबळ उडालीये. जवळपास 150 हुन अधिक कॉम्प्युटर या व्हायरसमध्ये करप्ट झाले आहे. याची माहिती सेंट्रल सर्व्हरवर आहे. महसूल आणि सार्वजनिक विभागातले हे संगणक आहेत. हा व्हायरस दूर करण्याचं आयटी विभागाचं काम सुरू आहे.

त्यामुळे कर्मचार्‍यांना जीमेल वापरायला सध्या बंदी आहे. त्याऐवजी केवळ ऑफिशियल मेल वापरायचे आदेश दिले आहे. तसंच, यूएसबीही न वापरायचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्रालयात एकूण 5000 कॉम्प्युटर सिस्टीम आहेत. जे कॉम्प्युटर करप्ट झाले आहे त्यातील डाटा मिळवण्याचं काम सुरू आहे.

मंत्रालयातील कॉम्प्युटरवर व्हायरसचा हल्ला
– लॉकी रॅन्सन नावाचा व्हायरस
– 150 हुन अधिक सिस्टीम करप्ट
– महसूल आणि सार्वजनिक विभागातील कॉम्प्युटर करप्ट
– जी-मेल वापरण्यास बंदी
– USB न वापरण्याचे निर्देश


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा