पहिल्यांदाच राजकारण ‘आवडलं’,रामगोपाल वर्मांचं अंगुरलतांबद्दल खट्याळ ट्विट

May 25, 2016 6:51 PM0 commentsViews:

मुंबई – 25 मे : आसामची बहुचर्चित आणि नवनिर्वाचित आमदार अंगुरलता डेटा यांच्यासंदर्भात एक खट्याळ ट्विट केल्याने सिने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. जर आमदार असे दिसायला लागले तर राजकारणात नक्कीच अच्छे दिन आलेत. मला पहिल्यांदाच राजकारण आवडलं आहे असं ट्विटचं रामगोपाल वर्मा यांनी केलंय.rv_twitt

पूर्वाश्रमीची मॉडेल असलेली अंगुरता डेटा नुकत्यात आसामच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यात. पण आता त्यांच्या सुंदरतेवरून सोशल मीडियावर चांगलीच खमंग चर्चा रंगलीय. याच वादात आता राम गोपालवर्मांनी उडी घेतलीये. जर आमदार असे दिसायला लागले तर राजकारणात नक्कीच अच्छे दिन आलेत….थँक यू अंगुरलता जी. थँकू मोदीजी, मला पहिल्यांदाच राजकारण आवडलं आहे, असं एक खट्याळ ट्विटच राम गोपाल वर्मांनी केलंय. पण त्यांच्या याच ट्विटवरून वादंगही निर्माण होण्याची शक्यता आहे.

रामगोपाल वर्माचं ट्विट

“जर आमदार असे दिसायला लागले तर राजकारणात नक्कीच अच्छे दिन आलेत….थॅक यू अंगुरलता जी. थँकू मोदीजी, मला पहिल्यांदाच राजकारण आवडलं आहे”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा