बुलडाण्यात उष्माघाताने घेतला चिमुरड्याचा बळी

May 25, 2016 7:03 PM0 commentsViews:

buldhana3बुलडाणा – 25 मे : जिल्ह्यात सूर्य आगओकत असून या उन्हामुळे खामगाव तालुक्यातील आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. या बालकाचे नाव प्रज्वल रवींद्र वानखडे आहे.

 प्रज्वल आपल्या घरासमोर उन्हात खेळत असतांना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर त्याला उलट्या झाल्यामुळे तात्काळ सिल्वर सिटी रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात तापमान गेल्या काही दिवसांपासून 43 अंशापलीकडे गेले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 6 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून अजूनही उष्माघाताच्या रुग्ण संख्येत वाढ होतांना दिसत आहे. यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचावकरिता विशेष खबरदारी घेणे गरजेचं झालं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा