रोल, कॅमेरा आणि ड्रग्स…मनिषाची कहाणी

May 25, 2016 8:08 PM0 commentsViews:

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकरांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडतं. बॉलिवूडचे अनेक असे अभिनेते अभिनेत्री हीट वर हीट सिनेमे देतात. पण काळाच्या ओघात हे कलाकार कोणत्या कोपर्‍यात जाऊन बसतात, हे माहित होत नाही…अशीच एक गोष्ट आहे बॉलिवूडमधील अभिनेत्री मनिषा कोईराला हिची.

मनिषाने 1991 मध्ये सौदागर या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिचा साधा भोळा चेहरा लोकांना खूप आवडला. आणि बघता बघता ती स्टारही झाली. तिने एका मागोमाग विविध प्रकारच्या चित्रपटांत काम केले. बॉम्बे,, मन, अकेले हम अकेले तुम, दिल से, 1942-ए लव्ह स्टोरी असा अनेक गाजलेल्या चित्रपटात मनिषाने आपली छाप सोडली. त्यावेळी मनिषा ही सर्व हिरोईन मधून टॉप हिरोईन बनली. बॉम्बे आणि कंपनी या चित्रपटासाठी तिला फिल्म फेअर ऍवॉर्डही मिळाला होता. पण कालांतराने तिला मिळत चाललेलं हे यश ती जास्त वेळ टिकवू शकली नाही. अपयशामुळे ती तणावाखाली जात गेली. तणावामुळे तिला ड्रग्ज आणि दारुची सवय लागली. मनिषा ड्रग्स आणि दारूच्या इतक्या आहरी गेली की त्यातून ती लवकर बाहेर येऊ शकली नाही.

मनिषाच्या करिअर प्रमाणेच तिच खासगी आयुष्यही चर्चेत राहिलं. मनिषाची नेपाळमधील सम्राट दहल या उद्योजकासोबत भेट झाली. हळुहळु सम्राट दहल आणि मनिषाच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 19 जून 2010 मध्ये ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. तेव्हा हळूहळू ती तणावातून बाहेर पडायला लागली. परंतु ही जोडी जास्त काळ टिकू शकली नाही. रोजच्या भांडणामुळे तिने 2 वर्षांतच घटस्फोट घेतला. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे ती तणावात गेली. हा तणाव दूर करण्यासाठी तिला परत ड्रग्ज आणि दारुच्या आहरी गेली. मध्यंतरी मनिषाला कॅन्सरने गाठलं. पण, तिने कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली. मात्र, तिच्या या परिस्थितीमुळे अनेक सिनेमे तिच्या हातातून जायला लागले. आता सध्या ती परत सिनेमामध्ये दिसणार असल्याचं सांगितलं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा